वक्तृत्व स्पर्धेचे विषय
विचारक्रांती युवा वक्ता – २०२७ या स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेले विषय.
लोकशाही जिवंत आहे; फक्त तिचा आवाज 'म्यूट' केला आहे !
ज्यांनी इतिहास लिहिला, त्यांनी काही पानांवर शाईऐवजी मौन सांडलं आहे.
पंढरीच्या वाटेपासून कुंभाच्या घाटापर्यंत धर्माचा शोध
तिच्या यशाचा सत्कार झाला; स्वातंत्र्याची मात्र चौकशी झाली !
पृथ्वीचा ताप वाढतोय; माणसाच्या संवेदना मात्र गोठत आहेत !
डीपफेकच्या जगात सत्याची ओळखपत्रं कोण देणार ?
Gen Z : व्यवस्थेने घडवलेली की व्यवस्था बदलायला निघालेली ?
स्पर्धेसाठी नोंदणी करा
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत नोंदणी लिंकचा वापर करा.
तुमची नोंदणी आजच पूर्ण करा!
ऑनलाइन नोंदणीसाठी खालील बटणावर क्लिक करा. Google Form उघडल्यानंतर आवश्यक माहिती भरून तुमचा अर्ज सबमिट करा.
नोंदणी फॉर्म भरानोंदणी Google Form द्वारे केली जाईल.
महत्त्वाची माहिती
वयोमर्यादा
२५ वर्षे
स्पर्धकाचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
प्रवेश शुल्क
₹१५०
प्रत्येक स्पर्धकासाठी प्रवेश शुल्क ₹१५० इतके असेल.
प्रवेश मर्यादा
४० स्पर्धक
अंतिम ४० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.
सादरीकरणाची वेळ
६ मिनिटे
प्रत्येक स्पर्धकाची सादरीकरणाची वेळ ६ (५ + १) मिनिटे असेल.
ओळखपत्राबाबत सूचना
स्पर्धकाने महाविद्यालयाचे किंवा कोणतेही एक शासनमान्य ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे.
नोंदणीपूर्वी नियम वाचा
स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी संपूर्ण नियमावली काळजीपूर्वक वाचा.
नियम व अटी पहा